You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात आरोग्य शिबिर संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात आरोग्य शिबिर संपन्न

*वैभववाडी महाविद्यालयात आरोग्य शिबिर संपन्न

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचालित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर बुधवार दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाले.
सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबईचे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, स्थानिक समिती सचिव श्री.प्रमोद रावराणे, प्रवीण पेडणेकर, सुधीर नकाशे, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय रावराणे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, नाक-कान-घसा तज्ञ अशा विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम विशेष उपस्थित होती. नागरिकांची सखोल तपासणी करून डॉक्टरांनी आवश्यक ते उपचार, औषधोपचार आणि पुढील वैद्यकीय प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. या शिबिरात ऑपरेशन करण्यायोग्य ५० रुग्णांना बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी वालावलकर रुग्णालय डेरवण येथे घेऊन जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात महाविद्यालयातील प्राध्यापक व शिशिक्षकेतर कर्मचारी, तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाचे विशेष योगदान होते.
या शिबिराचे प्रमुख आयोजक आणि मार्गदर्शक म्हणून महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या स्थानिक समितीचे सचिव श्री. प्रमोद रावराणे यांनी विशेष परिश्रम घेतले. भविष्यात अशाच आरोग्य शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा