वेंगुर्ले :
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरातील दहा प्रभागांत प्रचाराचा शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात आघाडीने देव देवतांचे आशीर्वाद घेत प्रचारकार्य सुरू केले.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय प्रमुख आर. के. जाधव, बुथ प्रमुख विलास कुबल, उमेदवार युवराज जाधव, यशस्वी नाईक, योगेश नाईक, रूपेश गोंतलकर, प्रसाद खानोलकर, दीपाली प्रीतम वाडेकर, शर्मिला शेनाई, सुप्रिया कोंडसकर, जयंवत म्हापणकर, पलाश वाडेकर, वैभव जाधव, विशाखा जाधव, मयुरेश जाधव, अर्जुन मठकर, यशश्री जाधव, जागृती जाधव, पल्लवी मठकर, गीता जाधव, मंदाकिनी जाधव, अनुसया जाधव, सुरेश जाधव, सुनीता जाधव, साईश जाधव, यश जाधव, रोशन जाधव, अक्षया जाधव, वासंती जाधव उपस्थित होते.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घराघरांत संपर्क साधत प्रचाराची सुरुवात उत्साहात झाली.
