अनुया कवडे यांना राष्ट्रीय भारत भूषण आदर्श शिक्षिका पुरस्कार.
पुणे
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल अनुया कवडे यांना साई ज्योती फाउंडेशन तर्फे यावर्षीचा” राष्ट्रीय भारत भूषण आदर्श शिक्षिका” 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.
शालेय शिक्षक, शैक्षणिक सल्लागार, ट्रेनर अशा विविध पदांवर गेल्या 20 वर्षांपासून अनुया या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.विशेष मुलांसाठी अनुया यांचे खास योगदान आहे .बीजेस या सेवाभावी संस्थे तर्फे शालेय गुणवत्ता सुधारणा प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र आणि छत्तीसगढ येथे प्रकल्प प्रमुख या पदावर काम केले आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा, कॉलेजेस मध्ये पेस अंतर्गत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्याचे योगदान आहे.
हा पुरस्कार मिळाल्याने अनुया यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी आयोजक सचिन हळदे, साई ज्योती फाउंडेशन चे उपाध्यक्ष,विकास उबाळे, साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष डॉ.शंकर आदानी अभिनेत्री मृणाली कुलकर्णी ,फिल्म अभिनेता युवराज कुमार ,अभिनेत्री केतकी गावडे ,यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आला.पदाधिकारी आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
