युवा संवादातून होणार दिशा–निर्देश
उपमुख्यमंत्री शिंदे, आमदार केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली; विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कुडाळ :
शिवसेना मुख्य नेते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार दीपक केसकर व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना सिंधुदुर्गतर्फे आयोजित युवा संवाद मेळावा आज गुरुवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठिक ३.३० वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे होणार आहे.
या मेळाव्यास पूर्वेश सरनाईक (युवासेना कार्याध्यक्ष), राजन तेली (माजी आमदार), राहुल राहुल लोंढे (युवासेना मुख्य सचिव), किरण साळी (युवासेना सचिव), संजय आंग्रे (उपनेते), दत्ता सामंत (जिल्हाप्रमुख), संजु पराब (जिल्हाप्रमुख), दीपलक्ष्मी पडते (महिला सेना जिल्हाप्रमुख), नीता कविटकर (महिला सेना जिल्हाप्रमुख), राहुल अवघडे (युवासेना कोकण निरीक्षक), संग्राम साळसकर (युवा सेना जिल्हाप्रमुख), मेहुल धुमाळे (युवा सेना जिल्हाप्रमुख), हर्षद ढेरे (युवासेना जिल्हाप्रमुख), सोनाली पाटकर (युवती सेना जिल्हाप्रमुख) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व युवासेना, युवती सेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, कार्यकर्ते आणि युवा शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडोलकर यांनी केले आहे.
