You are currently viewing वेंगुर्ले भाजपाचा प्रभाग ३ व ४ मध्ये देवदर्शनाने प्रचाराचा शुभारंभ

वेंगुर्ले भाजपाचा प्रभाग ३ व ४ मध्ये देवदर्शनाने प्रचाराचा शुभारंभ

वेंगुर्ले :

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये स्थानिक देवतांचे आशिर्वाद घेत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रभागातील गणपती मंदिर, काका–काकी मंदिर, पिंपळेश्वर, श्री स्वयंभू मंदिर, लोपाद्रेश्वर मंदिर, ब्राम्हण देवस्थान, लक्ष्मीनारायण मंदिर आणि भवानी देवस्थान येथे श्रीफळ अर्पण करून शुभारंभ झाला.

वेंगुर्ले शहरात सर्वप्रथम देवदर्शन करून प्रचाराची सुरुवात करण्याची परंपरा भाजपाने यंदाही कायम राखली. प्रभाग क्रमांक ३ व ४ चे भाजपामधून अधिकृत उमेदवार सुहास गवंडळकर, गौरी मराठे, सुधीर पालयेकर आणि आकांक्षा परब यांच्या प्रचाराचा प्रारंभ अशा मंगलमय वातावरणात झाला.

या प्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, तसेच अमेय धुरी, दिनेश धर्णे, मयुरेश फाटक, गौरेश गावडे, भुपेन हादगे, हिमांशू कुडपकर, यतीन कुडपकर, साहील कुडपकर, अंकित राणे, नितीन राणे, अक्षय सावंत, प्रणीत सावंत, बाबल अणसुरकर, दीपक परब, राज परब व यश परब यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा