*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष लेखक कवी श्री पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*=== गोड तक्रार ===*
आई बघ गं दादा कशा खोड्या काढीतो
ईकडून तिकडून येतो आणि गालगुच्चा घेतो
चाफ्याची ती फूले सारी गोळा केली मी
जास्त घेतली दादाने बघ मला किती कमी
भातुकलीच्या बाहुलीचा गालगुच्चा घेतो
न्हाऊ घालताना तिचा खाऊ घेऊन जातो
चिमणचारा टाकुन केल्या चिमण्या गोळा
खड्यामागे टिपू धावला चिमण्या सार्या गेल्या
झाडावरती बसुन दादाने खडा होता मारला
रडु लागल्यावरती माझे डोळे पूसू लागला
तूला सांगितल्यावर आई बोलत तो नाही
त्याच्यावाचुन आई मला मग करमत गं नाही!!!
*…….• पांडुरंग कुलकर्णी.*

