You are currently viewing उमाळा

उमाळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”उमाळा”*

 

उमाळा येतो भारावलेल्या भावनांतून

निसर्गाची लीला आहे स्वाभाविक अगाधIIधृII

 

आईला बाळाचा समुद्राला किनाऱ्याचा

मेघांना आभाळाचा अंधाराला प्रकाशाचा

गुरुदत्तांना उमाळा आहे गोमाता श्वानII1II

 

भूमीला अंकुर जळाचा गाईला पाडसाचा

मृदुंगाला मुखलेपाचा कृष्णाला वेणूचा

गोपींना कान्हाचा भुंग्याचा उमाळा मधांतII2II

 

मत्स्याला जळाचा कोकिळेला वसंताचा

स्वर सराव कवीला शब्द वक्त्याला रसिकांचा

असतो समजायचा भावनां वरूनII3II

 

जिभेला बोलण्याचा चवीचा तेलाला वातीचा

फुलाला सुगंधाचा संस्कृतीला संस्काराचा

उमाळालां नसते वेळ काळ स्थान II4II

 

नेत्रांना दृष्टीचा दुःखाला अश्रूंचा वृक्षांना वेलीचा

चंद्राला चांदण्याचा उमाळा गुरूंना शिष्याचा

उमाचा उमाळा कार्तिकेय गजानन ज्ञात II5II

 

श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =