_*भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सर्वेक्षा ढेकळेचे वक्तृत्व स्पर्धेत यश….*_
सावंतवाडी
_सेवाभावी भारतीय संस्था, सावंतवाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु.सर्वेक्षा नितीन ढेकळे हीने पाचवी ते सातवी या गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ‘बालपण हरवत चाललंय’ या विषयावरील ही स्पर्धा पंचम खेमराज महाविद्यालयात संपन्न झाली._
_यावेळी सर्वेक्षा हिला रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._
