ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारांचा एबी फॉर्म दाखल
विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढविण्याचा निर्धार
सावंतवाडी
ठाकरे शिवसेनेकडून श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकर यांचा आशीर्वाद घेत उमेदवारांनी आज नगर परिषदेत एबी फॉर्म दाखल केले आणि प्रचाराचा शुभारंभ केला. आगामी निवडणूक पूर्णतः विकासाच्या मुद्द्यांवर लढविण्यात येणार असून कोणावरही टीका-टिप्पणी न करता शहर व प्रभागांचा सर्वांगीण विकास साधणे हेच ध्येय असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ तसेच युवा सेना तालुकाप्रमुख व सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची भूमिका पक्षनेत्यांनी स्पष्ट केली.
