You are currently viewing विषय — स्वप्न

विषय — स्वप्न

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम दर्पण काव्य रचना*

 

*विषय— स्वप्न*

 

स्वप्न

सोनेरी भविष्याचे

स्वप्न

त्यासाठी ध्यासाने वेडे होण्याचे

स्वप्न

पूर्तीसाठी, चिकाटीने,जिद्दीने अथक परिश्रम करण्याचे

स्वप्न

अपयशाने खचून न जाता, ठामपणे प्रयत्नात सातत्य राखण्याचे

स्वप्न

अंती, यशाने हुरळून न जाता ,जमीनीवर पाय रोवून उभे रहाण्याचे

स्वप्न

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा