*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कोंदण भावनांचे*
〰️〰️〰️〰️〰️〰️
शब्दांना असावे कोंदण भावनांचे
जणु रत्नजडित अलंकार देखणे
शब्दसुखाच्या अथांग महासागरी
मुक्त जगुनी तृप्त व्हावे स्वैर डुंबणे
शब्दातुनी कळावा अर्थच जीवनाचा
जीणे व्हावे सात्विक सुखाचे सोहळे
मनामनातुनी पेरित जाता भक्तीप्रीती
नेत्री , रुजावे कोदंडधारी रूप सावळे
व्रत मानवतेचे तपस्याच पुण्यकर्मी
रचिते रांजण संचिताचे ओसंडणारे
हवीच कशा उद्याची चिंता जगताना
लाभता स्पर्श स्पंदनांना कुरवाळणारे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️ वि . ग.सातपुते.( भावकवी )*
*📞( 9766544908)*
