गरिबांच्या पैशाला वाली कोण ?

गरिबांच्या पैशाला वाली कोण ?

गरिबांच्या पैशाला वाली कोण ?

बावीस लाखांच्या कर्ज वाटपात फ्रोड….

कुडाळ / पूनम राटूळ :-

घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला बचतगट महासंघाने बावीस लाखाच्या केलेल्या कर्ज वाटपात मोठे गौडबंगाल झालेले आहे. पैसे वाटपामध्ये तब्बल बावीस लाख देताना कोणतीही शहानिशा केली गेली नाही. सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे येथील एका बचतगटास २२ लाखांचा चेक देण्यात आला.

व्यवसायासाठी २२ लाख देताना कोणतीही शहानिशा न करता पैसे दिले गेले. यात भ्रष्टाचार झाल्याची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत अनेक बाबी उघडीस आल्याची चर्चा सुरु आहे. यातील नऊ लाख रुपये पुन्हा वर्ग करून घेण्यात यश आले आहे. उरलेले १३ लाख मिळणार कसे? या भ्रष्टाचारात कोण कोण सहभागी आहेत ? त्या बचत गटांची ऐपत नसताना २२ लाख दिलेच कसे? याबाबत सवाल उपस्थित होत आहेत.

यामध्ये एका माजी राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस पाठीशी घालत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. जिल्हा परिषदांच्या सीईओ मार्फत प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गोरगरीबांच्या पैशाला वाली कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पै पै गोळा करून गरीब महिलांनी बचत गटांचे जमविले पैसे असून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. कुडाळ तालुका पंचायत समिती माजी महिला पदाधिकारी यांचा या प्रकरणात हात असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा