मालवण :
मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पाचव्या दिवशी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मिळून एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्व अर्ज नगरसेवक पदांसाठीच दाखल झाले आहेत.
दाखल झालेल्या अर्जांमध्ये शिवसेना (उद्धव) पक्षाचे ८, काँग्रेसचे २, भाजपचा १ आणि अपक्ष १ असा समावेश आहे.
विविध प्रभागांतील उमेदवारी :
प्रभाग क्र. १ अ – काँग्रेस तर्फे संदेश कोयंडे, प्रभाग क्र. १ ब – शिवसेना (उद्धव) तर्फे पूजा जोगी, प्रभाग क्र. ६ अ – शिवसेना (उद्धव) तर्फे महेश जावकर, प्रभाग क्र. ६ ब – शिवसेना (उद्धव) तर्फे स्मिता सरमळकर, अपक्ष – श्रेया सरमळकर, प्रभाग क्र. ७ ब – शिवसेना (उद्धव) तर्फे गौरी मायकेर, प्रभाग क्र. ८ अ – शिवसेना (उद्धव) तर्फे मंदार ओरसकर, प्रभाग क्र. ८ ब – काँग्रेस तर्फे रूपाली सकपाळ, प्रभाग क्र. ९ अ – भाजप तर्फे पंकज सादये, शिवसेना (उद्धव) तर्फे निलेश दूधवडकर, प्रभाग क्र. ९ ब – शिवसेना (उद्धव) तर्फे माधुरी प्रभू, प्रभाग क्र. १० अ – शिवसेना (उद्धव) तर्फे तपस्वी मायकेर
सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले.
याआधी चौथ्या दिवशी ठाकरे शिवसेना तर्फे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
प्रभाग २ अ – उमेश पुरषोत्तम मांजरेकर, प्रभाग २ ब – अनिता पॉली गिरकर, प्रभाग ३ अ – उमेश अरविंद चव्हाण
१७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. तर २ डिसेंबर २०२५ मतदान होणार आहे.

