उमेदवारीपूर्वी समीर नलावडे यांची राणे साहेबांकडे भेट; आशीर्वाद घेत उद्या अर्ज दाखल करणार
कणकवली
कणकवली नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उद्या आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. राणे साहेबांनी नलावडे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

