You are currently viewing फोंडाघाट ग्रामपंचायतीत घरकुल योजनेचा महा मेळावा संपन्न — नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य

फोंडाघाट ग्रामपंचायतीत घरकुल योजनेचा महा मेळावा संपन्न — नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य

फोंडाघाट ग्रामपंचायतीत घरकुल योजनेचा महा मेळावा संपन्न — नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य

फोंडाघाट (प्रतिनिधी) :

फोंडाघाट ग्रामपंचायतीत घरकुल योजनेचा महा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. बीडीओ अनिलकुमार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सरपंच संजना आग्रे आणि उपसरपंच तन्वी मोदी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेची मंजुरीपत्रे वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरे मंजूर झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले होते. सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहून कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी बीडीओ चव्हाण यांच्याकडून योजनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना नाडकर्णी यांनी त्यांना “सक्षम अधिकारी” अशी गौरवपदवी दिली.

अजित नाडकर्णी यांनी सांगितले की, आपल्या शेजारच्या घोन्सारी गावातील अधिकारी आज फोंडाघाट ग्रामपंचायतीसाठी सेवा देत आहेत, याचा सर्वांना अभिमान आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या आवारात जत्रेसारखी गर्दी दिसून आली होती.

कार्यक्रमादरम्यान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ चेही अजित नाडकर्णी यांनी कौतुक केले. सर्व ग्रामपंचायत कर्मचारी कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्धपणे काम पाहत होते आणि नागरिकांची विचारपूस करत होते. शेवटी सरपंच संजना आग्रे व उपसरपंच तन्वी मोदी यांनी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

— अजित नाडकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा