You are currently viewing पक्षशिस्त भंग प्रकरणी संदेश वरक यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी – जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी

पक्षशिस्त भंग प्रकरणी संदेश वरक यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी – जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी

पक्षशिस्त भंग प्रकरणी संदेश वरक यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी – जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी

दोडामार्ग
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोडामार्ग तालुका उपसंघटक संदेश वरक यांची पक्षशिस्तीचा सातत्याने भंग केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

वरक यांनी पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सतत टीका करून पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यांना वारंवार समज दिल्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने आज झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

या बैठकीस जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा पदाधिकारी तसेच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे, संदेश वरक हे स्वतः या बैठकीस उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीतच त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला.

“शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिस्तीला सर्वोच्च स्थान आहे. कोणत्याही व्यक्तीला संघटनेविरोधी काम करण्यास किंवा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास मुभा दिली जाणार नाही,” असे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा