You are currently viewing नगरपरिषद निवडणुकीपूर्वी वेंगुर्ल्यात पोलिसांचे पथ संचलन

नगरपरिषद निवडणुकीपूर्वी वेंगुर्ल्यात पोलिसांचे पथ संचलन

नगरपरिषद निवडणुकीपूर्वी वेंगुर्ल्यात पोलिसांचे पथ संचलन;

कायदा-सुव्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज

वेंगुर्ले,
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मॉब डिस्पर्सल व दंगा काबू योजना अंतर्गत पथ संचलन करण्यात आले. या उपक्रमाचे मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी श्री. विनोद कांबळे यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत पोलीस दलाने वेंगुर्ला शहरातील प्रमुख भागातून संचलन काढले.

संचलनादरम्यान वेंगुर्ला बाजारपेठ, चार गदा मारुती मंदिर परिसर, गाडी अड्डा, दाभोली नाका आणि शिरोडा नाका या ठिकाणांवरून पोलिसांनी मिरवणूक काढत नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश दिला. निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हे संचलन करण्यात आले.

या उपक्रमात पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या नेतृत्वाखाली ३ पोलीस अधिकारी, २० पोलीस अंमलदार, १ आर.सी.पी. प्लाटून तसेच १० होमगार्ड सहभागी झाले होते. संपूर्ण संचलन शांततेत पार पडले. निवडणुकीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असा विश्वास पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी व्यक्त केला.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा