You are currently viewing देवकीचा पुत्र

देवकीचा पुत्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम गौळण*

 

*देवकीचा पुत्र*

 

रंग त्यांचा काळा निळा नवनीत गोळा

देवकीचा पुत्र बाई असे साधा भोळा ll ध्रु ll

 

काढीतो खोडी अशी विंचवाचा दंश

तिरुपती श्रीहरीचा असे तो वंश

रंगूनी रंगात साऱ्या

रंग हा वेगळा

देवकीचा पुत्र बाई असे साधा भोळा ll 1ll

 

येता जाता मारी

पत्थर घड्यावरी

गोपगोपिका आता दमल्या भारी

राना वना जाई गोवत्स चारी

कोणी म्हणे च्यारी कोण म्हणे गोपाळा

देवकीचा पुत्र बाई असे साधा भोळा ll 2ll

 

यमुनेच्या तिरी बसे कदंब फांदीवरी

गोपिकांची वस्त्रे टांगे झाडावरी

सूर मधुर निनाद घुमे

बासरी वरी

डोळे भरून पाही राधेचा सुख सोहळा

देवकीचा पुत्र बाई असे साधा भोळा ll 3ll

 

 

प्रा डॉ जी आर प्रविण जोशी

कॉपी राईट

कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा