मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, नारायण राणे, नितेश राणे यांच्यासह राज्यभर प्रचाराची धुरा
मुंबई :
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली प्रचाराची रणनिती आखली आहे. पक्षाच्या प्रचार मोहिमेसाठी तब्बल ४० प्रमुख नेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच विद्यमान खासदार नारायण राणे हे पहिल्या दहामध्ये आहेत.
या यादीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, श्री. शिव प्रकाशजी, श्री. अशोक चव्हाण, श्री. पीयूष गोयल, श्री. सुधीर मुनगंटीवार आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचाही समावेश आहे.
तसेच मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, रावसाहेब दानवे पाटील, ॲड. आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर, अमर साबळे, अतुल सावे, अशोक उईके, चित्रा वाघ, रक्षा खडसे, प्रवीण डेरेकर, डॉ. भगवत कराड, गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कुटे, अमित साटम, धनंजय महाडिक, ॲड. माधवी नाईक, रंधीर सावरकर, अशोक नेते, मंगेश चव्हाण, प्रसाद लाड आणि इद्रिस मुल्तानी यांचा देखील समावेश आहे.
या ताफ्यातील प्रमुख नेत्यांवर राज्यभरात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली असून, पक्षाची निवडणूक मोहीम आगामी काही दिवसांत जोर धरू लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
