*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझे बाबा*
कर्तव्यदक्ष, कुटुंब वत्सल,प्रेमळ
असती माझे आई आणि बाबा,
किती वर्णावीथोरवी,कशीसांगू
खरोखरी न कळे मजला बाबा
/१/
वयाच्या पंचविशीत जबाबदारी
उचलता घराची,कर्तव्याचीजाण
लहान भावंडांचे, पालन,शिक्षण
पित्यास हातभाराने येईमोठेपण
/२/
बुद्धीकौशल्याने मिळेश्रेणीप्रथम
आई सारखी सुशील गुण संपन्न पत्नी,गृहलक्ष्मीसहआदर्शसंसार
दशव्यक्तीयुक्त सुगृह कुटुंबसंपन्न
/३/
फक्त दोन जीव कमावते तरीही
साहिलाभारहोऊनिकुटुंबवत्सल
भावंडेशिक्षण,कार्येसर्वयथासांग
स्वकर्तृत्वेपार केले मनुजन्मांतर
/४/
आम्हांसहाभावंडांवर सुसंस्कार
सुविचार, सुशिक्षित,सद्धर्माचार
कलावैभवाची देणगी मिळाली
आणि मिळाला कल्पवृक्षाधार
/५/
असेऐश्वर्यसंपन्नप्रिय माझे बाबा
त्यांची स्वप्ने, त्यांचीमहत्वाकांक्षा
गरुडझेप घेता गगनी पायभूवरी
पूर्णत्वास न्यावीहीअसेआकांक्षा
/६/
असेअसावेनिर्मळ,प्रेमनिस्वार्थी
त्यागमय मूर्ती दयावान प्रिय ती
सदैव हात मदतीचा दुसर्यांसाठी
दु:ख साहुनि,ठेवती मागे स्मृती
/७/
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कलाशिक्षिका
विरार
