दिल्ली बॉम्बस्फोटाचा जाहीर निषेध करून फोंडाघाट ग्रामपंचायत कडून मृतांना श्रद्धांजली !
फोंडाघाट
भारताची राजधानी दिल्लीतील महत्त्वपूर्ण लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले, तर कित्येक जखमी झाले. या अतिरेकी स्फोटात मरण पावलेल्या निरपराधांप्रती संवेदना व्यक्त करून, फोंडाघाट ग्रामपंचायती कडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना सरपंच सौ. संजना आग्रे यांनी ह्या अतिरेकी बॉम्बस्फोटाची सखोल चौकशी करून,घटना ज्यांनी घडवून आणली त्यांचेवर कठोर कारवाई व शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पिंटू पटेल, पवन भालेकर, विठ्ठल लाड,मिलिंद लाड तसेच अनिकेत पारकर,विश्वनाथ जाधव, सुनील लाड,मनीषा चव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते…..
