You are currently viewing कणकवलीत संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

कणकवलीत संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

कणकवलीत संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक;

शहर विकास आघाडीबाबत निर्णयाची शक्यता

कणकवली

माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीतील घटक पक्षांची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी तसेच शहर विकास आघाडीच्या गठनाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीस युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, युवा सेना तालुका प्रमुख उत्तम लोके, संकेत नाईक यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

या बैठकीतून कणकवली नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची दिशा व रणनीती निश्चित होणार असून, शहर विकास आघाडीच्या स्थापनेचा निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा