*🦚 जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना 🦚*
*हरवलेली कविता*
कविता कुठे आता
माझ्या जवळ आहे
परवा विचारात होती
काल स्वप्नात होती
आज विस्मरणात आहे
कविता कुठे आता
माझ्या जवळ आहे
परवा डोईवर घेऊन
तिला मिरवीत होतो
स्वप्नातही कुरवाळत होतो
आज तिला आठवत आहे
कविता कुठे आता
माझ्या जवळ आहे
परवाच ती मला
विचारांच्या दारात
भेटली होती
स्वप्नातही भेटून
खुणावत होती
मग आज का ती
अशी कुठे हरवली आहे
कविता कुठे आता
माझ्या जवळ आहे
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर , धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
