मालवण / आचरा :
“प्रगत विद्यामंदिर रामगड कथामालेचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. या शाळेचे मुख्याध्यापक अंकुश वळंजू, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी आणि पालक आदींनी शाळेसाठी समन्वयाने गेली पाच वर्षे विविध क्षेत्रात जी प्रगती केली आहे, त्याचे फलित म्हणून आजचा हा कथामालेचा मानाचा पुरस्कार आम्ही त्यांना प्रदान करीत आहोत.” असे उद्गार सुरेश ठाकूर अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांनी काढले.
अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण माध्यमिक विभागाचा आदर्श कथामाला पुरस्कार २०२५प्रदान करीत असताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. असंही ते म्हणाले.
सदर कार्यक्रम प्रगत विद्यामंदिर रामगड च्या सभागृहात संपन्न झाला. व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी श्री वासुदेव प्रभुदेसाई(अध्यक्ष), सुभाष तळवडेकर(उपाध्यक्ष), विष्णू मटकर , संजय माने (गट शि क्षणाधिकारी, अंकुश वळंजू (माजी मुख्याध्यापक ), अंकिता वळंजू, केंद्र प्रमुख देवू जंगले, दीप्ती पेडणेकर (मुख्याध्यापिका ) आदी मान्यवर उपस्थित होते.
कथामालेच्या वतीने सुरेश ठाकूर अध्यक्ष, सुरेंद्र सकपाळ उपाध्यक्ष, सुगंधा केदार गुरव कार्यवाह, श्रुती गोगटे, मनाली फाटक या कार्यकर्त्याच्या हस्ते मुख्याध्यापक यांना शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी सुरेंद्र सकपाळ यांच्या हस्ते प्रभू देसाई, गुरव मॅडम यांच्या हस्ते सुभाष मटकर, श्रुती गोगटे यांच्या हस्ते अंकिता वळंजू यांचाही सत्कार करण्यात आला.
कथामालेच्या सत्काराला उत्तर देताना अंकुश वळंजू म्हणाले,”*साने गुरुजी कथामालेचे कार्य करीत असताना माझे विद्यार्थी, शिक्षक,पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले. या उपक्रमाचे महत्त्व मुलांना व पालकांना पटले. मी सेवानिवृत्त होत असलो तरी आमच्या शाळेत हा उपक्रम सदैव सुरू राहिल.
यावेळी व्यासपीठावर विजय कुवळेकर, वाघ, जाधव, सुभाष धुरी, अभय प्रभुदेसाई, घनश्याम चव्हाण, नरेंद्र हाटले , परुळेकर, घाडीगांवकर, लाड, हाटले, दिनेश सावंत, महादेव पवार, पुर्वा राणे, राजेंद्र देशमुख, धनश्री अडसूळ, अंजली पारकर, सुभम हाटले , विजय लिंगायत,भालचंद्र घाडीगावकर, रमेश जाधव आदी बहुसंख्य ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वाघ मॅडम यांनी केले तर आभार दिनेश सावंत यांनी मानले.
