You are currently viewing भेट….

भेट….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लावणी*

 

*भेट….*

 

फुले उमलली सेज सजली

यावे दरबारी थेट

राया तुम्ही घ्यावी आमची भेट

ll ध्रु ll

स्वागत तुमचे या मंचकी

हळूच सोडा मृदू कंचुकी

खोळ काढा सातारीची

स्वर निघू देत श्रेष्ठ

राया तुम्ही घ्यावी आमची भेट

 

ll 1 ll

 

रंग रंगला कात केवडा

लज्जत कस्तुरी

गंधित विडा

श्वास मध्ये श्वास विरुनी

मगच खुडावे देठ

राया तुम्ही घ्यावी आमची भेट

ll 2ll

 

लावा स्वर तो तार सप्तकाचा

खयाल असू दे वादी संवादीचा

इष्काची मग चाखा गोडी

गवसलं पाचूचे

बेट

राया तुम्ही अहो सख्या तुम्ही

घ्यावी आमुची भेट

ll 3 ll

 

प्रा डॉ जी आर प्रविण जोशी

नसलापूर

कॉपी राईट.

प्रतिक्रिया व्यक्त करा