*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आजोळ घर*
बालकविता ( पंचअक्षरी )
आजोळ घर
घाली पाखर
आजीची माया
साय साखर
आजोबा सुद्धा
खूप प्रेमळ
अंगावरची
जुनी वाकळ
खाडी किनारा
ओलांडे नाव
दिसू लागते
आजीचे गाव
इटुक-मिटुक
कौलारू घरे
त्यांची उघडी
सदैव दारे
मोठे अंगण
आंब्याचे झाड
सोबत देती
ताड नि माड
केवडा बन
निळी अबोली
कुंपणी शोभे
जुई , चमेली
आजीच्या गावी
पुष्कळ मासे
भाकरी जणू
चांदोबा भासे
अजून कधी
आठव येतो
आजीच्या गावी
घेऊन जातो
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
