You are currently viewing मनुजन्म

मनुजन्म

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनुजन्म*

 

मनुजन्मा ही तुझी कहाणी

लक्ष लक्ष योनी फिरुनी,

आलास या धरणीवरी

गतजन्मीचे ऋण घेऊनि /१/

 

कर्म तुझे जे हे घडले जेंव्हा

नव्हते तुजला माहित तेंव्हा,

कळले नव्हते इथे यावे केव्हा

अद्भुत याजन्माचे मोल मानवा

/२/

सर्व प्राणी जातीत उच्च प्रती

हा जन्म मिळाला तुज सार्थकी,

पार करुन बेडा चौर्याऐंशी लक्ष

योनीचा, गौरव मानवा सार्थकी

/३/

३० झाडाझुडपांचे अवडंबर

२७ किटक अन ९ जलचर

१४ पशुपक्षी आणि ४ इतर

या ८४ लक्ष योनी जन्मानंतर

/४/

आपण आलो या सुंदर देही

अवतरलो भुवरी,गतजन्मीचे

ऋण फेडण्या, हिशोब पुरता

सत्कर्मातुनि भोग या जन्मीचे

/५/

देवाने दिधला मनुजन्म कर्तव्य

कसोटी ,सक्षम,सृजन अटीवर

पंचेद्रियांची ग्रहण, सहनशक्ती

ज्ञानबुद्धी नीतीधर्म आचरणावर

/६/

अद्भुततेचे हे वरदान स्वीकार

मानवा तू करु नको अविचार

या जन्माचे मोल असेअनमोल

पुनर्जन्म न,हाच स्वर्णाविष्कार

/७/

निसर्गरमणीय सौंदर्यसोहळा

बुद्धीकौशल्याचा आशीर्वाद

प्रगतीची तेजोमय यशशिखरे

श्रद्धाभक्तीचा मिळे कृपाप्रसाद

/८/

सुबुद्ध,सुजाण मनुजा भाग्यवान

तू,सत्संगती,दे थारासुविचाराला

सत्कर्माने , जन्ममृत्यू चक्रातून

मोक्ष मिळे अविनाशीआत्म्याला

/९/

 

स्वरचना

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

विरार.

प्रतिक्रिया व्यक्त करा