You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा येथे ” आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” कार्यक्रमाने शुभारंभ

वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा येथे ” आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” कार्यक्रमाने शुभारंभ

वेंगुर्ले :

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि संकल्प करुन देशभर साजरा होत असताना, वेंगुर्लेत परबवाडा येथे भारत मातेसाठी मातीच्या पणत्या प्रज्वलीत करून देशासाठी स्वत:ला समर्पित करण्याची पंचप्राण शपथ घेण्यात आली.

दिनांक ९ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले जिवन समर्पित करणाऱ्यांचे स्मरण करण्यासाठी तसेच स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अशा शुर विरांना नमन करण्यासाठी शिला फलकाचे समर्पण , वसुधा वंदन , विरोंकों वंदन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .

यावेळी भाजप चे जिल्हा सरचिटणीस व अभियानाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी ” ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती ” याबद्दल माहीती देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण म्हणून ऑगस्ट क्रांतीदिन साजरा केला जातो असे सांगितले.

यावेळी सरपंच शमिका बांदेकर , उपसरपंच विष्णु उर्फ पपू परब , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस , माजी उपसरपंच हेमंत गावडे , संतोष सावंत , बॅ. बी.के. कॉलेज प्राध्यापक चुकेवाड सर, डी एस पाटील मॅडम व नैतान सर, ग्रामपंचायत सदस्या स्वरा देसाई , कार्तिकी पवार , अरुणा गवंडे , सूहिता हळदणकर , मुख्याध्यापक झोरे सर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब , जाधव सर , डॉ बाळू गवंडे ,अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , शैलेश बांदेकर , ॲना डिसोझा , सिद्धेश कापडोसकर , राजा परब व विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =