सावंतवाडी:
सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील रहिवासी संदीप महादेव धारगळकर (वय ६४) यांचे रविवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
संदीप धारगळकर गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्यावर बांबुळी येथील गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचार करण्यात आले होते. परंतु उपचारांना ते प्रतिसाद देत नसल्याने रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. रविवारी सकाळी त्यांची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भावजय, पुतणे असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी माजगाव एमआयडीसी येथे त्यांची अगरबत्ती व नंतर लोणच्याची फॅक्टरी होती.
