शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रावर 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली आहे.
या परीक्षेकरिता पेपर क्र. 1 साठी, 1 हजार 55 उमेदवार आणि पेपर क्र.2 साठी, 1 हजार 368 उमेदवार असे एकूण 2 हजार 423 उमेदवार बसणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 हजार 501 कुडाळ हायस्कूल कुडाळ, 4 हजार 502 एस. एम. हायस्कूल कणकवली, 4 हजार 503 विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, 4 हजार 504 कणकवली कॉलेज कणकवली, या चार परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 घेण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीच्या परीक्षेच्या पूर्व तयारीचा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा नियोजनावर चर्चा करण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या पूर्व तयारीबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव, तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.
यावेळी बैठकीस सदस्य तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी, शिक्षाणाधिकारी (योजना) सदस्य निलीमा नाईक, तसेच जिल्हा परिरक्षक फारुखी अहमदी, सहा. परिरक्षक अफसरबेगम अवटी, केंद्रसंचालक आदी उपस्थित होते.
| अ.क्र | परीक्षा केंद्र नंबर | परीक्षा केंद्राचे नाव | परीक्षार्थी संख्या |
| पेपर क्र.01 (वेळ-सकाळी 10.30 ते दु.1 वाजेपर्यंत) | |||
| 1 | 4501 | कुडाळ हायस्कुल कुडाळ | 420 |
| 2 | 4502 | एस.एम. हायस्कूल, कणकवली | 184 |
| 3 | 4503 | विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली | 384 |
| 4 | 4504 | कणकवली कॉलेज कणकवली | 67 |
| एकूण | 1055 | ||
| पेपर क्र.2 (वेळ दुपारी 2 ते 4.30 वाजेपर्यत ) | |||
| 1 | 4501 | कुडाळ हायस्कुल कुडाळ | 420 |
| 2 | 4502 | एस.एम. हायस्कुल कणकवली विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली | 184 |
| 3 | 4503 | विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली | 409 |
| 4 | 4504 | कणकवली कॉलेज कणकवली | 355 |
| एकूण | 1368 | ||
