You are currently viewing तुळस श्री देव जैतिर देवाच्या वार्षिक उत्सवास आज पासून प्रारंभ

तुळस श्री देव जैतिर देवाच्या वार्षिक उत्सवास आज पासून प्रारंभ

वेंगुर्ला

दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, नराचा नारायण म्हणून सुपरिचीत असलेले तुळव गावचे ग्रामदैवत श्री जैतीर देवाचा वार्षिक उत्सवास आज पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मंदिरांची रंगरंगोटी पूर्ण झाली असून मंदिर परिसरात दुकानेही थाटून ११ दिवस साजरा करण्यात येणाऱ्या या उत्सावासाठी तुळस ग्रामस्थ व भाविक सज्ज झाले आहेत.
श्री देव जैतिराच्या उत्सवासाठी मुंबई, गोवा, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत आहेत. हा उत्सव आज पासून सलग ११ दिवस चालणार असून गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे या उत्सवाला बऱ्याच भाविकांना येता आले नसल्यामुळे यावर्षी भाविक मोठया संख्येने सहभागी होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 2 =