You are currently viewing सावंतवाडीत ‘जनप्रतिनिधी-समुदाय संस्था समन्वय प्रकल्पाची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

सावंतवाडीत ‘जनप्रतिनिधी-समुदाय संस्था समन्वय प्रकल्पाची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

सावंतवाडीत ‘जनप्रतिनिधी-समुदाय संस्था समन्वय प्रकल्पाची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

सावंतवाडी

जनप्रतिनिधी-समुदाय संस्था समन्वय प्रकल्पांतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन कार्यशाळा सावंतवाडीत आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत गावपातळीवरील उपक्रमांचा सखोल आढावा घेण्यात आला.

कार्यशाळेची सुरुवात आणि उद्दिष्ट्ये

प्रार्थना आणि दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात झाली. त्यानंतर स्वागतगीताने सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा व्यवस्थापक (संस्था विकास व क्षमता बांधणी) स्वाती यांनी कार्यशाळेची प्रस्तावना केली. त्यांनी प्रकल्पाचे महत्त्व आणि आतापर्यंतची प्रगती विषद केली.

तळवडेच्या स्थानिक संसाधन व्यक्ती श्रीमती मयूरी दळवी यांनी एका प्रातिनिधिक सादरीकरणाद्वारे आपल्या कामाचा आढावा घेतला. तसेच, बालसभा सदस्य कौस्तुभ गावडे आणि प्रथमेश परब यांनी या प्रकल्पातील आपले अनुभव सांगितले. अक्षरज्योती योजनेच्या लाभार्थी श्रीमती भारती माणगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सातुळी-बावळाटच्या सरपंच सोनाली परब, तळवडेचे ग्रामपंचायत सदस्य केशव परब आणि भालावलच्या ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे यांनी प्रकल्पांतर्गत गावपातळीवर राबवलेल्या उपक्रमांचे अनुभव कथन केले. त्यांनी प्रकल्पाचे महत्त्व आणि त्यातून झालेले परिणाम व्यक्त केले. तसेच, पुढील काळातही प्रकल्पात शाश्वतता टिकून राहण्यासाठी सर्व ग्रामपंचायत आणि समुदायस्तरीय संस्था मिळून गावच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.

उपक्रमांचे प्रदर्शन आणि मार्गदर्शन

यावेळी गॅलरी वॉक आयोजित करण्यात आला होता, ज्यात नऊ प्रभाग संघानी मागील दोन वर्षात केलेल्या विविध उपक्रमांचे कल्पकतेने आलेख वापरून सादरीकरण केले. प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व कार्यक्रमांचे प्रदर्शन आणि मूल्यमापन करण्यात आले.

यावेळी कुटुंबश्री राष्ट्रीय संसाधन संस्था , केरळचे मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रशांत यांनी गॅलरी वॉक दरम्यान उपक्रमांवर चर्चा केली आणि पुढील दिशानिर्देश काय असतील, तसेच ध्येय निश्चित करून कशाप्रकारे काम करायचे यावर मार्गदर्शन केले.

त्यानंतर जिल्हा अभियान व्यवस्थापक पवार सर यांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या उपक्रमांबाबत जिल्हास्तरावर कसे काम केले जाईल, हे स्पष्ट केले. राज्य व्यवस्थापक प्रसाद सर यांनी आपले अमूल्य मार्गदर्शन केले.

प्रकल्पांतर्गत झालेला समन्वय केक कापून साजरा करण्यात आला, ज्यामुळे कार्यशाळेला उत्साहाचे वातावरण प्राप्त झाले.

मान्यवर आणि उपस्थित अधिकारी

या कार्यशाळेला कुटुंबश्री राष्ट्रीय संसाधन संस्था (NRO), केरळचे मा. प्रशांत पी (मुख्य कार्यकारी अधिकारी), प्रिया पॉल (प्रकल्प व्यवस्थापक), सम्यक लोहकरे (प्रकल्प प्रमुख), श्वेता पांढरे (राज्य प्रकल्प समन्वयक), महाराष्ट्र राज्याचे प्रसाद कांबळे (राज्य अभियान व्यवस्थापक), सिंधुदुर्गचे वैभव पवार (जिल्हा अभियान व्यवस्थापक), निलेश वालावलकर (जिल्हा व्यवस्थापक – माहिती व वित्तीय समावेशन), नितीन जावळे (जिल्हा व्यवस्थापक – संस्था विकास व क्षमता बांधणी) हे मान्यवर उपस्थित होते.

यासोबतच माजगाव, आंबेगाव, वेर्ले, सातोळी-बावळट, आंबोली, डिगणे-डोंगरपाल, आरोंदा, धाकोरे, तळवडे, वाफोली, शेर्ले या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी, सर्व समुदायस्तरीय संघ (CLF) चे पदाधिकारी/कार्यकारी समिती सदस्य, तालुका व्यवस्थापक (माहिती व वित्तीय समावेशन), सर्व प्रभाग समन्व्यक, समुदायस्तरीय संघ व्यवस्थापक, सामुदायिक सक्रियता गट सदस्य (CAM), जिल्हा व गट संसाधन व्यक्ती (DRP/BRP) आणि प्रभागातील स्थानिक संसाधन व्यक्ती/समुदाय संसाधन व्यक्ती (LRP/CRP) तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा