✒️भूमिपुत्र वाघ.
1987- 88 चा कार्यकाल. एक बॅग, त्यात एक ड्रेस, डोक्याला टोपी, चुकता एवढाच प्रपंच पाठीवरती टाकून पुणे सोडलेले, विचाराने कृतीने, झपाटलेले असे ते महामानव हा शब्द वापरायला माझ्यासाठी येथा योग्य होईल..
सामाजिक बदलासाठी गावागावात युवकांची फळी निर्माण करणे, समाजातले, गावातले गावकुसातले प्रश्न चव्हाट्यावर मांडणं, मग प्रश्न असेल पाण्याचा, शिक्षणाचा, रोजगाराचा, दुष्काळाचा, युवकांच्या सामाजिक राजकीय नैतिक मूल्य घेऊन बदलाचा. ह्या युवकांना भेटून दुसऱ्या युवकांच्याकडे. दुसऱ्या युवकांच्या कडून सायंकाळी एका गावात, दुपारी दुसऱ्या गावात, सकाळी तिसऱ्या गावात गाव सभा, मीटिंग, मेळावे, कार्यकर्त्यांची प्रशिक्षणे, गावभेटितून गाव प्रश्न उचलायचे. सरकारी दप्तरी मांडायचे. ग्रामपंचायत,पंचायत समिती, कलेक्टर कचेरी ते मंत्रालय.प्रश्न चव्हाट्यावर मांडणे आणि सोडविने हा त्यांचा जणू हातखंडाच बनवून गेलेला होता.
गावागावात हजारो युवा तयार केले. संघटित केले जाणीव संघटनेच्या नावाने विविध गावांमधून, तालुक्यातून आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून कैक शाखा निर्माण केल्या. युवक प्रशिक्षणाच्या माध्यमातून, बाल मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बदलाचे जणू वादळच निर्माण केलं.
गाव स्वच्छते पासून ते सोच खड्ड्यापर्यंत. गाव विकासापासून ते शेती विकासापर्यंत. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत. सातत्याने नवा समाज निर्माण करण्याचं जणू विद्यापीठ निर्माण केलं.
पंचायतराज व्यवस्थेमध्ये सरकारचा निधी थेट ग्रामपंचायत पर्यंत पोहोचला. आणि खऱ्या अर्थाने गावागावात भ्रष्टाचाराची पाळीमुळे मजबूत व्हायला 1990-91-92 सालापासून सुरुवात झाली.
पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत गाव विकासाचे खर्च व्हायचे. परंतु त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सरकारने स्वीकारल्यानंतर तो निधी थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर चालला. आणि तेथून सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पंचायत समिती यांच्यामार्फत पैशाचा धुरळा वाजायला सुरुवात झाली. गावागावातल्या युवकांनी हा विषय लावून धरला. हो नाही म्हणूनच तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विश्वनाथ (अण्णा) तोडकर या नावाचं वादळ मराठवाड्यात निर्माण झालं.
एका बाजूला बालसंस्कार वर्ग, दुसऱ्या बाजूला युवक संघटन, तिसऱ्या बाजूला शेतकरी शेतमजूर, चौथ्या बाजूला दलित अत्याचारच्या प्रश्नावर आवाज उठविणे, पाचव्या बाजूला जमिन अधिकार आंदोलन, सहाव्या बाजूला एकल महिलांचे पुनर्वसन, सातव्या बाजूला भूकंप, आठव्या बाजूला दुष्काळ, नव्या बाजूला कोविड19, दहाव्या बाजूला महापूर अशा विविध नैसर्गिक आपत्तीला समर्थपणे तोंड देऊन लोकांच्या मनावरती विचारावरती मायचं,पांघरून घालणारा हा महामानवच होय.
एका बाजूला समाजातला नाही रे वर्ग संघटित करणे, दुसऱ्या बाजूला सरकार सोबत लढा देणे. तिसऱ्या बाजूला विकासाचे मॉडेल गावापर्यंत पोहोचविणे.चौथ्या बाजूला आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या उपेक्षितांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.हे काम पुणे मुंबई पासून ते नागपूरच्या कोपऱ्यापर्यंत.दगड गोट्याचा प्रवास, कैक किलोमीटर पायी प्रवास, कधी एसटी, कधी पाई, कधी मोटरसायकल, ठिकाणा नाही.वेळ नाही. पैसा नाही,आणि तरीही झपाटल्यासारखा एक तरुण महाराष्ट्राचं वैभव ठरला.
मराठवाड्यामध्ये झालेली गायरान अतिक्रमणाची आंदोलने, एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक आणि धार्मिक पुनर्रचनेसाठी विशेष कार्य, तिसऱ्या बाजूला अपेक्षतांच्या मदतीला अर्थसहाय्य घेऊन जणू बांधावर विठ्ठल उभा रहावा.
विविध विकासाचे मार्ग शोधणे अभ्यास करणे आणि ते मार्ग लोकांच्या प्रति अर्पण करणे. असा हा झंजावात 1985 पासून ते 2025 वर्ष म्हणजे तब्बल चाळीस वर्षाचा न थांबणारा प्रवास.न थकणारं समाजाला जनू रोज नवीन ऊर्जा देत राहणार विद्यापीठच म्हणायला हरकत नाही.
विश्वनाथ अण्णा तोडकर यांची 61 साजरी करायला.त्यांच्याबद्दल दोन शब्द लिहायला. व्यक्त व्हायला. इथे जागा मिळाली. आणि आम्ही धन्य झालो.
माझ्या सामाजिक क्षेत्रातली पहिली वाट दाखवणारा माझा धर्मगुरू त्यांचं नाव आहे विश्वनाथ (अण्णा) तोडकर. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शेकडो सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था निर्माण करून सामाजिक चळवळीचं जणू विद्यापीठ निर्माण केलं. अशा माझ्या धर्मगुरूंना 61 निमित्ताने लाख लाख शुभेच्छा…!
