*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विद्यार्थ्यांची धडकेल लाट*
असली जरी त्रिपुरी पौर्णिमा
*नको पाडू तू असा उजेड*
पळून जाईल अंधार मनाचा
होशील पास तू *बीए बीएड*…1
ग्रॅज्युएट सुध्दा धुतात *कार*
परदेशात जायच्या हव्यासाने
नाहीत नोक-या *तेथे तयार*
असून बड्या बड्यांचे कारखाने..2
अनिश्चितेच्या अडकून भोवऱ्यात
कशाला फसायचे तेथे जावून
शिक्षकापेक्षा खो-याने ओढशिल
खाजगी क्लासेस येथे चालवून..3
आहेस तशी तू प्रचंड मेहेनती
जनसंपर्कही आहे *अफाट*
नको करायला जाहिरात भारी
*विद्यार्थ्यांची धडकेल लाट*…4
विद्या नसते कधी विकायची
रूजवायची असते मनामनात
धरणे बांधून शाळा काॅलेजांची
पाजून वाढवायची जनमानसात..5
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157

