You are currently viewing सावंतवाडीत भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

सावंतवाडीत भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून उभारलेले आधुनिक कार्यालय — जनतेच्या सेवेसाठी सदैव खुले राहणार

सावंतवाडी :

भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडीत सुरु करण्यात आलेल्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सेवा मिळणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरागावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवराज लखमराजे भोसले, तसेच भाजपा युवा नेते विशाल परब, सौ. वेदिका परब, सुधीर आडिवरेकर, संदीप गावडे, सागर ढोकरे, दिलीप भालेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, दिपाली भालेकर, विराग मडकईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मोरोडोंगरी-माजगाव परिसरातील हे आकर्षक कार्यालय जनतेच्या संपर्कासाठी आणि पक्षाच्या कार्यासाठी नवीन ऊर्जेचे केंद्र ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा