स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या शिक्षकांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
सावंतवाडी
दिनांक ४ नोव्हेंबर २०२४, मंगळवार रोजी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांना सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार व सहा. शिक्षिका सौ. अमृता बी. सावंत यांना सर्वोत्कृष्ट बाह्य परीक्षा समन्वयक म्हणून शिक्षण क्षेत्रात त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. विनोबा भावे नाट्यगृह, वाशी मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. पुरस्कारांचे वितरण मा. डॉ. किरण बेदी, भारताच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आणि सुश्री साइना नेहवाल, ऑलिम्पिक पदक विजेती आणि नामवंत बॅडमिंटन खेळाडू यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, शाळेचे संचालक मा. अॅड. श्री. रुजुल पाटणकर यांच्या प्रेरणेने व प्रोत्साहनामुळे ही कामगिरी यशस्वीरित्या पार पडली असे म्हणत प्रशालेच्या संचालकांचे व विद्यार्थ्यांचेही वरील शिक्षकांनी विशेष आभार व्यक्त केले.

