You are currently viewing महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी वैभव कवडे यांची ‘स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर’ पदावर निवड

महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी वैभव कवडे यांची ‘स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर’ पदावर निवड

कुडाळ :

कुडाळ येथील महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी वैभव कवडे याची ‘स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर’ या पदासाठी दिमाखदार निवड झाली असून, त्याने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हा यशाचा टप्पा गाठला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराज भोसले आणि श्रद्धाराज लखमराज भोसले यांच्या हस्ते वैभव कवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

कवडे यांच्या मेहनत आणि यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचीच चर्चा असून, त्याच्या या कामगिरीमुळे केवळ महेंद्रा अकॅडमीचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.

महेंद्रा अकॅडमीच्या टीमने वैभव कवडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले असून, आगामी काळातही ते अधिक उंच भरारी घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा