कणकवली :
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहपूर्ण आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. विद्यार्थ्यांनी मतपत्रिकांद्वारे मतदान करून आपले प्रतिनिधी निवडले. निवडणुकीसाठी शाळेचे वातावरण आनंदी आणि स्पर्धात्मक झाले होते. इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मतदान केंद्राची मांडणी विद्यार्थ्यांनी स्वतः केली होती.शिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली,तर काही विद्यार्थ्यांनी सहाय्यक म्हणून कार्य केले.निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
विजयी विद्यार्थ्यांची यादी:
विद्यार्थी प्रतिनिधी – प्रसन्न प्रमोद तळेकर
विद्यार्थिनी प्रतिनिधी – अंकिता पोपट शिंदे
सांस्कृतिक मंत्री – शुभम सुभाष साटम
सहल मंत्री – बाळकृष्ण संजय पांचाळ
क्रीडा मंत्री – प्रशिक सुनील कदम
संरक्षण मंत्री – प्रेरणा मिनेश तळेकर
सजावट मंत्री – पुनम संजय पांचाळ
शिस्त मंत्री – मृण्मयी दिलीप तळेकर
स्वच्छता मंत्री – राज अमित घाडी
फलोद्यान मंत्री – राज सचिन शेटये
पोषण आहार मंत्री – जानवी अनिल मालंडकर
प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की,“लोकशाहीचे खरे शिक्षण शाळेच्या अशा उपक्रमांतून मिळते.नेतृत्वगुण,जबाबदारी, संघभावना आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा विकास विद्यार्थ्यांत व्हावा, हेच या निवडणुकीचे उद्दिष्ट आहे.”
कार्यक्रमाचे संयोजन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका कानकेकर ए. बी.यांनी केले.शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली. विजयी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प केला.
