*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोमसाप मालवण शाखा सदस्या कवयित्री सौ आदिती धोंडी मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शीर्षक – जादूचे पीस*
🧚🧚🧚🧚🧚🧚🧚🧚
पऱ्यांच्या राज्यात
मला दिसली राणी
दिसत होती छान
गात होती गाणी
राणीने दिले मला
जादूचे सोनेरी पीस
सांगितले म्हणायला
अंक एक ते वीस
अंक म्हणायचा मला
फार यायचा कंटाळा
क्रमाने संख्या म्हणताना
मध्येच व्हायचा घोटाळा
जादूच्या पिसाची गंमत
पहायची होती मला
परीसारखे उडण्याची
शिकायची होती कला
सगळे अंक म्हटले मी
शांतपणे उभे राहून
आनंदाने उडालो मी
जादूचे पीस पाहून
*🖊️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

