वेंगुर्ले :
मातोंड गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मातोंड येथील सातेरी देवी हे कुलदैवत असून, दरवर्षीप्रमाणे ते या जत्रोत्सवात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मातोंड देवस्थानतर्फे देण्यात आली आहे.
