You are currently viewing उद्या सावंतवाडी येथे भाजपाच्या सिंधुदुर्ग जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

उद्या सावंतवाडी येथे भाजपाच्या सिंधुदुर्ग जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून साकारलेले कार्यालय; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी (ता.०३):

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील माजगाव, शिरोडा नाका, मोर डोंगराजवळ उभारण्यात आलेल्या ‘भाजपा सिंधुदुर्ग जनसंपर्क कार्यालयाचे’ उद्घाटन बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी एका दिमाखदार सोहळ्यात होणार आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेश राणे यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवा-सुविधांसाठी तसेच पक्षीय कामकाजाला गती देण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.

या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेताताई कोरगांवकर, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

📍स्थळ: माजगाव, शिरोडा नाका, मोर डोंगराजवळ, सावंतवाडी

🕓 वेळ: सायं. ४ वाजता

📅 दिनांक: बुधवार, ०५ नोव्हेंबर २०२५

प्रतिक्रिया व्यक्त करा