You are currently viewing विघ्नसंतोषींचा विकृत प्रकार!

विघ्नसंतोषींचा विकृत प्रकार!

विघ्नसंतोषींचा विकृत प्रकार!

मदतीसाठी लावलेल्या बॅनरवरील रवी जाधव यांचे नाव व फोटो फाडला

सावंतवाडी

रुग्णांना मदत करण्यासाठी लावण्यात आलेल्या “मदतीसाठी संपर्क साधा” या बॅनरवरील संपर्क व्यक्ती रवी जाधव यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक एका विघ्नसंतोषी व्यक्तीने परवाच्या दिवशी फाडून टाकला. इतक्यावरच न थांबता काल रात्री त्याच बॅनरवरील रवी जाधव यांचा फोटोदेखील फाडण्यात आला आहे.

रुग्णांना सेवा पुरविण्याच्या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या या उपक्रमावर अशा विकृत कृतीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजातील काही व्यक्तींना इतरांच्या सेवाभावाचा हेवा वाटत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते.

सदर घटनेमुळे स्वयंसेवक वर्गात नाराजी व्यक्त होत असून, “अशा प्रकारच्या विघ्नसंतोषी वृत्तीमुळे आम्ही रुग्णसेवा बंद करायची का?” असा संतप्त प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने अशा विघातक प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

_________________________
*संवाद मीडिया* 

*🌟🏗️ गृहप्रकल्प बांधकामासाठी सुवर्णसंधी!* 🏠🌟

*📍 लोकेशन – दोडामार्ग*

*आम्हाला हवे आहेत 🔧*
*👷‍♂️ सेटरीग मेस्त्री*
*👷‍♀️ गवंडी (Contractor)*

*🏗️ गृहप्रकल्प बांधकाम साईटवर कामासाठी तातडीने गरज आहे!*

*💰 योग्य मेहनताना + उत्तम सुविधा*

*📲 इच्छुकांनी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधा 👇*

*📞 9158696418*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/186773/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा