पुणे:
सौ.व श्री. मृणाल जैन यांच्या आदिश जैन फाऊंडेशन या अद्ययावत सभागृहाचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाचे औचित्य साधून पुण्यातील ख्यातनाम साहित्यिक संस्थांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी संगीतकार गायक डॉ.सलील कुलकर्णी यांच्या सुरेल गीतांचा बहारदार कार्यक्रमही पार पडला. हे सभागृह पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सर्वांनाच त्याचा लाभ होईल असे श्री.जैन यांनी सांगितले.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी डॉ.महेंद्र ठाकूरदास, वि. ग. सातपुते (आप्पा), डॉ.श्रीपाल सबनीस, डॉ.सलील कुलकर्णी, सौ. मृणाल जैन. सौ.वंदना घाणेकर, मकरंद घाणेकर, सौ.मनिषा साने, अपर्णा आंबर्डेकर, सौ. जयश्री श्रोत्रीय, ॲड.संध्या गोळे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
