You are currently viewing श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ५ नोव्हेंबर रोजी दीपोत्सव!

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ५ नोव्हेंबर रोजी दीपोत्सव!

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ५ नोव्हेंबर रोजी दीपोत्सव!

मालवण

श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या श्री सदगुरू भक्त सेवा न्यास रजि.संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ :०० वा. श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ति वरती आणि पादुकांवर जलाभिषेक आणि दुग्धाअभिषेक आणि पूजन, सकाळी ९ : ०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वा. नैवेद्य आणि आरती,

दुपारी १ :०० वा. महाप्रसाद-अन्नदान,

सायंकाळी ६:३० वा. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दीपोत्सव,सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती,

रात्री ८:०० वा. सुस्वर भजन

मशेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आपईवाडी, मुणगे, देवगड. बुवा- श्री. राजेंद्र प्रभू, तबला – श्री. सुनिल बोरकर.उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा