रवी जाधव यांचे झालेले नाव बॅनर फाडून जाणार नाही-रूपा मुद्राळे
सामाजिक बांधिलकीचा हॉस्पिटलच्या भिंतीवर लावलेला बॅनर अन्यात व्यक्तीने फाडला.
सावंतवाडी
गेली पाच वर्ष कोरोना काळापासून सामाजिक बांधिलकीचे आम्ही पदाधिकारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना सेवा देत आलेलो आहोत रुग्णांना कुठच्याही प्रकारची अडचण येऊ नये या करिता आम्ही हॉस्पिटल तसेच हॉस्पिटलच्या बाहेर बॅनर लावून त्यावर आमचे नंबर दिले आहेत त्यामुळे कित्येक रुग्णांना याचा फायदा झालेला आहे. आमच्या या फोन नंबर वरून रुग्णांच्या नातेवाईकांचा कितीही वाजता फोन आला तरी आम्ही तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन त्या रुग्णाला सहकार्य करतो. कधी कधी पहाटे दोन ते तीन वाजता रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन येतात परंतु त्याही वेळी आम्ही तत्काळ पोहोचतो.
रवी जाधव हे रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य आहेत. रवी जाधव व लक्ष्मण कदम नेहमीच रात्रीच्या वेळी रुग्णांसाठी 9 ते 12 या कालावधीमध्ये हॉस्पिटलमध्ये सेवा देतात कारण या कालावधीमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त असते अशाप्रकारे आम्ही रुग्णांना मदत करतो हे काही समाजकंटकांना मान्य नाही त्यामुळे त्यांनी रवी जाधव यांचे नाव व फोन नंबर फाडून टाकला आहे. तुम्ही बॅनर वरील नाव फाडू शकतात पण समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसांच नाव कुणाच्या मनातलं तुम्ही कसे फाडू शकतात.
तरीही या वाईट कृत्याच आम्ही निषेध करतो. उद्या सकाळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर ऐवळे व सावंतवाडीचे पोलीस अधीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे आम्ही सर्व सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रीतसर लेखी तक्रार करून जे हे कोणी कृत्य केले आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करणार आहोत.
