You are currently viewing कोलगाव ग्रामदेवत श्री देवी सातेरीचा ७ रोजी वार्षिक जत्रोत्सव

कोलगाव ग्रामदेवत श्री देवी सातेरीचा ७ रोजी वार्षिक जत्रोत्सव

कोलगाव ग्रामदेवत श्री देवी सातेरीचा ७ रोजी वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी (प्रतिनिधी) :

कोलगाव येथील ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव ७ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्त मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात येणार आहे.

सकाळी श्री देवी सातेरीची पूजा-अर्चा, त्यानंतर आकर्षक स्वरूपात पुन्हा पूजन, दुपारी मानाचे नैवेद्य तसेच ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १२ वाजता मंदिराभोवती होळताशांच्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह मंदिरात पालखी मिरवणूक काढण्यात येईल.

रात्री 1 वाजता पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा