You are currently viewing कणकवली, कुडाळ येथील युवकांचा मनसे मध्ये पक्षप्रवेश…

कणकवली, कुडाळ येथील युवकांचा मनसे मध्ये पक्षप्रवेश…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आला प्रवेश

कणकवली प्रतिनिधी:-
मनसे नेते अभिजित पानसे, पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ व कणकवली तालुक्यातील युवा कार्यकर्त्याचा मनसे मध्ये पक्षप्रवेश करण्यात आला आहे. हा पक्षप्रवेश जिल्ह्यातील इतर युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी असणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.
हा पक्षप्रवेश परशुराम उपरकर यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. यावेळी उपरकर यांच्या मान्यतेनुसार कुडाळ मनविसे तालुका अध्यक्ष पदी अक्षय गुरव, कणकवली मनविसे तालुका अध्यक्ष पदी सुरज नाईक, आंब्रड जि.प. उपतालुकाअध्यक्ष पदी सदाशिव गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी उपजिल्हाअध्यक्ष दया मेस्त्री, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, जिल्हा सचिव बाळा पावसकर, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, ग्रामपंचायत सदस्य पिंगोळी बाबल गावडे, तालुका सचिव राजेश टंगसाळी, जगन्नाथ गावडे, सुंदर गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − eleven =