*वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण*
*महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध शासकीय योजनांची दिली जाईल माहीती* .
वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा च्या वतीने सर्व वयोगटातील महिलांसाठी हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित केले आहे. सदर प्रशिक्षण शिबीर भाजपा युवा नेते विशालभाई परब यांनी पुरस्कृत केले आहे .यामध्ये उमा इन्स्टिट्यूट, चिपळूण च्या संचालिका सौ. उमा म्हाडदळकर या मोत्यांचे दागिने, फॅब्रिक दागिने (कपड्यांपासून) , काथ्याच्या दोरी पासून शोभेच्या वस्तू, मॅट रांगोळी, व या प्रशिक्षणाचे खास आकर्षण…फॅशनच्या दुनियेत सध्या ट्रेंड असलेला *सब्यासाची ब्लाउज* शिकवण्यात येणार आहे. सदर शिबीर ३ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी ३ ते ६ वेळात साईमंगल कार्यालय , वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे .यावेळी महिलांना इतर शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे . तरी वेंगुर्लेतील जास्तीत जास्त महीलांनी सहभागी होऊन या मोफत प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा , असे आवाहन भाजपा महीला मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे .
*दिनांक —3, 4 व 5 नोव्हेंबर*
*ठिकाण—- साईमंगल कार्यालय, एस टी स्टॅण्ड नजीक*
*वेळ— दुपारी 3 ते 6*
*महत्त्वाची टीप* —- प्रशिक्षिका आपलं सामान आणून शिकवणार आहेत पण शक्य असल्यास पहिल्या दिवशी येताना कात्री, कॅनव्हास, शर्टींगचं जुनं कापड, ग्लु, रंगीबेरंगी घरातलं असलेलं कापड, मॅट रांगोळी वुल घेऊन येणे.

