*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कळी गंधली*
〰️〰️〰️〰️
मीच केलेले प्रेम तुझ्यावरी
तुला तर कधी कळले नाही
चुकलेच असेल माझे काही
भावप्रीत मी विसरलो नाही
कळी गंधली पाहत जगलो
प्रारब्धेच हुंगता आली नाही
निर्मितीतलेच पावित्र्य सुंदर
कधीच भाळी लाभले नाही
तरीही तुला शोधीत राहिलो
जीव हा कुठेच रमला नाही
मीच केलेले प्रेम जे तुजवरी
तुला तर कधी कळले नाही
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*वि.ग. सातपुते.( भावकवी )*
*बेंगलोर*
📞 *( 9766544908)*
