सातार्डा ग्रामदैवत रवळनाथ पंचायतनचा जत्रोत्सव ५ रोजी.
सातार्डा
सातार्डाचे ग्रामदैवत रवळनाथ पंचायतन देवस्थानचा जत्रोत्सव सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेला बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार, ६ नोव्हेंबरला रवळनाथ पंचायतन देवस्थानचा कवळास सोहळा होणार आहे. जत्रोत्सवादिवशी बुधवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी नैवेद्य होणार आहे. रात्री ११ वा. पालखी प्रदक्षिणा होणार आहे. नंतर आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. ६ नोव्हेंबरला श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा कवळास सोहळा होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वा.च्या दरम्यान कवळास सोहळ्याला थाटात सुरुवात होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

